दुकानातून सव्वा लाख रुपयांचे साहित्य लंपास ; धरणगाव येथील घटना
जळगाव : धरणगाव शहरातील चोपडा रोडवरील दुकानातून चोरट्यांनी सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरांनी लांबविला. मधुकर झिपरू मिस्तरी यांचे चोपडा रस्त्यावरील दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी वेल्डिंग मशीन, रसवंती मशिन, इलेक्ट्रिक मोटार, वायर बंडल, मोटार स्विच, वेल्डिंग रॉड आदी साहित्य लंपास केले.
४ एप्रिलला मधुकर मिस्तरी हे सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानावर गेल्यावर दुकानाचे शटरचे उघडे होते. आत गेल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात धरणगाव पोलिस स्थानकात प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत दुकानदाराकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी पोलिस हेड कान्स्टेबल विनोद संदानशिव उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे काम सुरू केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम