पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ |  विवाहित महिलावर सासरकडून छळ त्रास होण्याचे प्रकार घडतात. असाच प्रकार जळगाव येथे घडला .घर बांधण्यासाठी माहेराहून पाच लाख रूपये आणावे अशी मागणी पतीसह करीत सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याचे गैर प्रकार समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पतीसह चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ज्ञानदेव नगर येथील मोहिनी बेंडाळे यांचा विवाह जळगाव तालुक्यातील खेडी येथील तुषार ज्ञानदेव बेंडाळे यांच्यासोबत झाला. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्यांकडून मोहिनीने तिच्या माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावे अशी मागणी करण्यात आली. याच कारणावरून तिला पतीने मारहाण केली तर सासरच्या मंडळींनी उलट सुलट बोलून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

मोहिनी बेंडाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती तुषार ज्ञानदेव बेंडाळे , सासरे ज्ञानदेव नामदेव बेंडाळे , नणंद कुमुदिनी जगदीश कोल्हे सर्व रा. खेडी ता. जळगाव व दीर प्रवीण ज्ञानदेव बेंडाळे रा. एमआयडीसी जळगाव या चारजणांविरुध्द शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रकाश युवराज पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like