चिखली येथील रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ |    प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची सेवा दिली जाते. जळगाव येथे मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील आजाबराव सिताराम पाटील या रेशन दुकानदारावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धान्याचा परस्पर काळ्याबाजारात विक्री करणे एका रेशनदुकानदाराला चांगलेच भोवले आहे.

तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत केले आहे. पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी 70 क्विंटल गहू, 36 क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे. रेशन दुकानदार हे काळ्या बाजाराने रेशन धान्य विकतात जिल्हा पुरवठा प्रशासन यांना पाठीशी घालत आहे दिसून येते.

नागरिकांची होणारी गैर सोय कधी थांबवणार गरजु लोक आपल्या हक्काचे राशन घेतात परंतु तेही त्यांना मिळत नाही आता भिक मांगायची काय असे आरोप महिलांनी केले. शासन मार्फत मिळणाऱ्या मोफत राशनही दिले जात नाही मागणी केली तर फॉर्म भरून दया अशे अनेक फॉर्म भरून जमा केले असुन देखिल धान्य मिळत नाही.याबाबत मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (वय-२७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव सिताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like