ब्रह्माकुमारीज् तर्फे व्यसन आणि अवगुणमुक्त समाजनिर्मितीचे प्रमुख कार्यक्रम – ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी

खान्देश लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I व्यसनामुळे अनेक पीढ्या क्षीण होताहेत त्याचबरोबर अवगुण आणि मनोविकारांमुळे समाज मानसिकरित्या दुर्बल होत चालेला आहे या दोन्ही बाबींवर नवीन वर्षात ब्रह्माकुमारीज् तर्फे प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात येतील असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी केले.
मुल्याधिष्ठीत समाजनिर्मितीचे व्रत घेतलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मार्फत समाजाच्या सर्व घटकांसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. सन 2023 मध्ये व्यसनमुक्त आणि अवगुणमुक्त समाजाच्या दिशेने ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राच्या माध्यमातून मोठे समाज प्रबोधन अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन युगपरिवर्तन सेवादिनदर्शिका-2023 चे प्रकाशन प्रंसगी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, ब्रह्माकुमारीज् जळगाव यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाच्या वीस प्रमुख प्रभागामार्फत नवीन वर्षातील कार्यक्रमाचा आढावा ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक व दिनदर्शिकेचे संपादक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी घेतला. बी.के.मिनाक्षीदीदी, ज्येष्ठ राजयोगी मधुकर सोनार, ब्रह्माकुमारी हेमलता दीदी, डॉ. किरण पाटील, प्रा. मिलन भामरे, डॉ. सोमनाथ वडनेरे आदिंच्या शुभहस्ते सेवादिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आभार ब्र.कु. वर्षा यांनी केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम