महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्रात  दिनांक 01 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा 2022 चे आयोजन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिंपीक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सदर स्पर्धामध्ये 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून यापैकी खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब व शूटींगबॉल हे चार क्रीडा प्रकार जळगांव जिल्हयाला मिळालेले आहेत. त्यानुसार 1 ते 12 जानेवारी, 2023 या दरम्यान चारही क्रीडा प्रकारांच्या स्पर्धाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धामध्ये सहभागी होणान्या खेळाडु संघ व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक, पंच व इतर पदाधिकारी यांचा निवास, भोजन, प्रवास खर्च, दैनिक भत्ता, गणवेश, व स्पर्धा करिता येणान्या खर्चाचे अंदाजपत्रक मा. आयुक्त, महोदय यांना सादर करण्यात आलेले आहे.

मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या समन्वय सभेत ठरल्यानुसार महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा ज्योत रॅलीचे आयोजन सर्व विभागीय उपसंचालक, क्रीडा विभाग मुख्यालयाच्या जिल्हयाच्या ठिकाणी करण्याचे निश्चित झालेले आहे. या संदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातून भव्यतेने क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करून क्रीडा वातावरण निर्मीतीस पोषक ठरणार आहे.

ऑलिंपिक क्रीडा ज्योत कार्यक्रमानुसार 29 डिसेंबर, 2022 रोजी जळगांव जिल्हयात सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा ज्योत रॅलीची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथून होणार असून शिवतिर्थ चौक, टॉवर चौक, पांडे चौक, स्वातंत्र्य चौक, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे समारोप होणार आहे. सदर रॅलीमध्ये जिल्हयातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, जिल्हयातील राज्य तसेच केंद्राचे क्रीडा पुरस्कार प्राप्त, आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like