किराणा दुकानातून ९० हजारांची रोकड चोरणारा फरार आरोपीला अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | किराणा दुकानातून ९० हजारांची रोकड घेऊन फरार झालेल्या आरोपीला एलसीबीने ४ महिन्यानंतर अटक केली आहे .
फिरोज नुर मोहमंद शहा वय २० रा. गेंदालाल मिल असे संशयिताचे नाव आहे.

आनंद नागला या व्यावसायिकाचे शिवाजी नगर येथे किराणा दुकान असून चोरट्यांनी शटर वाकवून दुकानातील गल्ल्यामधून ९० हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना २ जुलै २०२२ रोजी घडली होती . याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे किसन नजन पाटील यांनी पथक तयार केले. यात

पोहेकॉ जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, ईश्वर पाटील यांच्या पथकाने फिरोज याला रविवारी रेल्वे स्टेशन परिसरातून पूलाखालून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like