पाचोऱ्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १७ ऑक्टोबर २०२२ | क्षुल्लक कारणावरून तरुणांसह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा प्रकार पाचोरा शहरातील देशमुखवाडी येथे घडला असून याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशमुख वाडी येथे राहणार कल्पेश अरुण माने (वय – २०) १६ आॅक्टोबर रोजी आपल्या घराजवळ उभा असतांना रितेश पाटील रा. कृष्णापुरी, रागाने का बघतो असे बोल;ल्यावरून दोघान्मध्ये चांगलाच वाद झाला . यावेळी घटनास्थळी तुषार पाटील, ललित महाजन, उमेश पाटील व भोला पाटील (दुंड्या) सर्व रा. कृष्णापुरी, आदींनी तातडीने पोहचून त्यांनी कल्पेश माने याचेसह त्याची आई, वडिल व भावाला चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित आरोपी रितेश पाटील याने फिर्यादी कल्पेश माने याचे डोक्यात दगड मारुन जखमी केले. घटनेप्रकरणी कल्पेश माने याचे फिर्यादीवरून तुषार पाटील, ललित महाजन, उमेश पाटील, भोला पाटील उर्फ दुंड्या या पाच जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन तपास दिलीप वाघमोडे हे करीत आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like