धनुर्विद्या स्पर्धेत जिज्ञासा भारंबे हिने पटकाविले कांस्यपदक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I  अहमदनगर येथे झालेल्या दक्षिण विभागीय धनुर्विद्या अर्थात तिरंदाजीच्या सामन्यात डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएससई स्कूलची विद्यार्थिनी जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने १४ वर्षांखालील रिकर्व्ह फेरीत ७२० पैकी ५८८ गुण मिळवून कांस्य पदक प्राप्त केले आहे. तिच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

देशभरातून या स्पर्धेसाठी सीबीएसई शाळांमधील १०० स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात केरळ, नागपूर, पुणे, नाशिक, सातारा, गोवा, अहमदनगर, दिल्ली, जळगाव येथील विद्यार्थ्यांचा समावेश होता. यात गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सी.बी.एस.ई. स्कूल सावदा येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणार्‍या कु.जिज्ञासा प्रशांत भारंबे ह्या विद्यार्थीनीने चौदा वर्षाखालील वयोगटातील राष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

 

उत्कृष्ठपणे खेळत जिज्ञासाने धनुर्विद्या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. ७२० पैकी ५८८ गुण संपादन करत कांस्यपदकाची ती मानकरी ठरली. राष्ट्रीय स्तरावरील तिरंदाजी सामन्यांसाठी जिज्ञासाची निवड झाली आहे.
जिज्ञासाला स्कूलमधील क्रीडा शिक्षक अस्लम अली, वसीम शहा, प्रशांत सर, प्रशिक्षक रमेश सर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेनशचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, प्राचार्या भारती महाजन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like