न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत देवाजी तोफा गुंफणार उद्या दुसरे पुष्प 

बातमी शेअर करा

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा परिवर्तनाचा प्रवास उलगडणार

खान्देश लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ Iगांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यानमालेमध्ये 27 डिसेंबर 2022 रोजी देवाजी तोफा हे दुसरे पुष्प गुंफणार आहेत. ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ याविषयावर ते संवाद साधतील. अवघ्या 500 लोकवस्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा गावाचा रोचक इतिहासासह परिवर्तनाची प्रेरक कहाणी काही महत्त्वाच्या आठवणींचे क्षण उलगडणार आहेत.

जैन हिल्समधील गांधी तीर्थ येथील कस्तूरबा सभागृहामध्ये दि. २७ डिसेंबर ला संध्याकाळी ४ वाजेला श्री. देवाजी तोफा व्याख्यानात मार्गदर्शन करतील. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची असेल. वरिष्ठ गांधीयन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यात तत्वनिष्ठता, सज्जनता आणि विवेकशीलता यांचा संगम होता. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी कार्य केले आणि सर्वोदय समाज घडविण्यासाठी दिशा दिली. त्यांच्या सन्मानार्थ 2021 पासून गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्याख्यानमाला आयोजित केली जात आहे. मागील वर्षी डॉ. अभय बंग यांनी मार्गदर्शन केले तर यावर्षी श्री. देवाजी तोफा दुसरे पुष्प गुंफतील.

वन अधिकार कानून – २००६ नुसार २००९ मध्ये सामुहिक वन अधिकार पत्र प्राप्त करणारे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा-लेखा ही ग्रामसभा देशातील पहिली ठरली होती. यावेळी ‘दिल्ली, मुंबई हमारी सरकार, हमारे गाव में हम ही सरकार’ याचा बुलंद आवाज सार्थक करणारे मेंढा-लेखा गावाचे नायक श्री. देवाजी तोफा हे ‘सर्व सहमति से ग्राम स्वराज की ओर’ या विषयावर संवाद साधणार आहे. यावेळी मेंढा-लेखा गावात झालेल्या परिवर्तनिय बदलांविषयीची रोचक माहिती न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या स्मृति व्याख्यानाप्रसंगी उपस्थितांना श्री. देवाजी तोफा अवगत करतील. ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसभा व ग्रामपंचायत यांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्यांविषयी ते अवगत करतील. कुणीही न चुकवावे असे या व्याख्यानात ग्रामसभेचे महत्त्व त्यातील बाराकावे समजण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, सरपंच, राज्यशास्त्राचे विद्यार्थी यासह आदिवासी भागातील बंधू-भगिनींना अभ्यासपूर्ण माहिती श्री. देवाजी तोफा यांच्या व्याख्यानातून मिळेल. व्याख्यानास उपस्थितीत राहण्याचे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like