आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा संघ जाहीर
खान्देश लाईव्ह | ९ नोव्हेंबर २०२२ | नाशिक येथे महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर (१७ वर्षाआतील) आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा-2022
दि. 12 ते 17 नोव्हेंबर 2022 यादरम्यान होणार आहेत. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन चा संघ जाहीर करण्यात आला. यामध्ये तेजम केशव, करण पाटील, उजेर देशपांडे, अर्श शेख, शुभम चांदसरकर, सौम्या लोखंडे, इशिका शर्मा, गार्गी पाटील, सताक्षी वाणी, स्वरा पाटील या खेळाडूंचा समावेश आहे. संघाचे संघटक व प्रशिक्षक म्हणून अतुल देशपांडे व प्रणव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या प्रत्येक सदस्याला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी शुभेच्छा दिल्या. असोसिएशनचे सचिव विनीत जोशी व खजिनदार अरविंद देशपांडे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक किशोर सिंह यांनी पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम