पाडळसरे निम्न तापी प्रकल्पातील लोखंडी प्लेटा चोरल्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 30 डिसेंबर २०२२ | पाडळसरे निम्न तापी प्रकल्पातील साडेचार लाखांच्या लोखंडी प्लेटाच चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मारवड पोलिसात गुहा दाखल करण्यात आला.

सुमारे 4 ते 5 महिन्यांपूर्वी ते गुरुवार, 29 डिसेंबर 2022 च्या दरम्यान लोअर तापी प्रोजेक्ट पाडळसरे गट क्रमांक 137, व्हिलेज पोस्ट प्रोजेक्टच्या निम्म तापी प्रकल्प अंतर्गत चोरट्याने कळमसरे येथून महाराष्ट्र शासन लोअर तापी मेकिनिकल गेटचे कामासाठी लागणार्‍या चार लाख 64 हजार 940 रुपयांच्या 287 लोखंडी प्लेटा लांबवल्या. हाप्रकार लक्षात आल्यानंतर सुपरवायझर दिनेश ज्ञानेश्वर चौधरी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like