जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या यश हेमनानीची निवड

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | 30 डिसेंबर २०२२ | जिल्हा क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेल्या १७ वर्षाखालील ओपन स्कॉश स्पर्धा जिंकणाऱ्या व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथील विध्यार्थी यश हेमनानी याची येत्या जानेवारी मध्ये खेळविण्यात येणाऱ्या १७ वर्षाखालील राज्यस्तरीय अंतिम स्कॉश स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे विभागीय निवड चाचणी शिबीर आणि खेळाडूंमध्ये सामने खेळविण्यात आले, यात यश हेमनाणीने अपराजित राहून सर्व प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला. यश हेमनाणी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा प्रतिभाशाली युवा स्कॉशपटू आहे, त्याच्या या यशासाठी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले तर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे या विध्यार्थ्यांला मागदर्शन लाभले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like