खान्देशातील पहिल्या भरतनाट्यम ग्रंथालयाचे लोकार्पण

बातमी शेअर करा
अभिजात भारतीय कलांमध्ये नृत्य हि कला सर्वश्रेष्ठ मानली जाते. गायन,वादन आणि नृत्याच्या माध्यमातून नादब्रह्माची उपासना केली जाते. भरतनाट्यम नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारी खान्देशातील एकमेव संस्था असलेल्या मुद्रा स्कूल आँफ भरतनाट्यम या संस्थेतर्फे जळगाव येथील नवी पेठ येथे नुकतेच पहिल्या भरतनाट्यम ग्रंथालयाचे लोकार्पण सुप्रसिद्ध अभिनेता,लेखक,दिग्दर्शक प्रा.योगेश सोमण , मुंबई आणि जेष्ठ नृत्यगुरु डॉ.शरद पंड्या, बडोदा गुजरात यांचे हस्ते संपन्न झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा.डॉ.जयंत शेवतेकर यांच्या प्रेरणेतून आणि सहकार्याने हे ग्रंथालय उभे राहत असल्याचे मुद्राच्या संचालिका तथा नृत्य गुरु सौ.नेहा जोशी यांनी सांगितले.
ग्रंथालयाचे उद्घाटक प्रा.योगेश सोमण यांनी आपल्या मनोगतात संगीत आणि नृत्य अध्यापनात प्रात्यक्षिकासह विषयाचे शास्त्रोक्त ज्ञान आवश्यक असते , अश्या ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना एकाच ठिकाणी हा अनमोल ठेवा उपलब्ध होणार आहे. विद्यार्थिनी याचा पुरेपूर उपयोग करून कलेच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करावे असे विचार प्रकट केले. नृत्यगुरु डॉ.शरद पंड्या यांनी विद्यार्थिनींना आपल्या कलेप्रती समर्पित राहुन गुरुंच्या मार्गदर्शनाने एक उत्तम कलाकार म्हणून तयार व्हा. या शब्दात आशीर्वाद दिला.
नृत्य अध्यापनात अत्यंत  उपयुक्त अशी पुस्तके या ग्रंथालयासाठी डॉ. शेवतेकर यांनी उपलब्ध करून दिली आहे. हि पुस्तके विद्यार्थिनींना अध्यापनासाठी विनामुल्य उपलब्ध करुन देणार असल्याचेही आयोजकांनी जाहीर केले.
या प्रसंगी मान्यवरांसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.विनीत जोशी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like