केंद्रीय मंत्री नारायण राणे १९ एप्रिल रोजी जिल्ह्यात

बातमी शेअर करा
वाशिम :  केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे १९ एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी ८:३० वाजता विमानाने अकोला विमानतळ येथे आगमन व वाशिमकडे प्रयाण. सकाळी १०:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व राखीव. सकाळी १०:४५ ते दुपारी १२:१५ वाजेपर्यंत आयोजित शासकीय बैठकीला उपस्थिती. दुपारी १२:१५ वाजता विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी १२:३० वाजता विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १२:३५  ते दुपारी १:०५ वाजेपर्यंत पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थिती. दुपारी १:०५ वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांचे निवासस्थानाकडे रवाना.निवासस्थानी भोजन करून  दुपारी १:४५ वाजता स्वागत लॉन येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी प्रयाण. दुपारी १:५० ते  ते २:५० वाजेपर्यंत मेळाव्याला उपस्थिती. दुपारी २:५० वाजता वाशिम तालुक्यातील साखराकडे प्रयाण. दुपारी ३ ते ३:३० वाजेपर्यंत साखरा येथील शाळेच्या बांधकामाची  व कृषिविषयक कामाची पाहणी. दुपारी ३:३० वाजता साखरा येथून मंगरूळपीर,शेलुबाजारमार्गे शासकीय वाहनाने अकोलाकडे प्रयाण करतील.
बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like