जळगावत प्रेडियाट्रिक होर्मो केअर सेंटरचे उद्घाटन

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | गोदावरी समूहाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते डॉ.अजिंक्य राजेंद्र पाटील यांच्या प्रेडियाट्रिक होर्मो केअर सेंटरचे उद्घाटन अतिशय थाटात करण्यात आले.

याप्रसंगी गोदावरी समूहाच्या सदस्या डॉ. केतकीताई पाटील, हृदयविकर तज्ञ डॉ.वैभव पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ.राजेंद्र फिरके, डॉ.शुभांगी फिरके, डॉ.सृष्टी पाटील, सौ.आरती पाटील आणि जळगाव मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जळगाव शहरात प्रथमच व एकमेव असलेले बालग्रंथी विकार व वाढ विशेषज्ञ डॉ.अजिंक्य राजेंद्र पाटील यांच्या हॉर्मोकेयर बालरोग एंडोक्राइनोलॉजी केंद्र सुरु झाले आहे. शहरातील भास्कर मार्केटजवळील गणपती सीटी स्कॅन सेंटरच्या पहिल्या मजल्यावर हे केंद्र असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like