राज्यपाल कोश्यारी , सुधांशु त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध
|खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा शेंदुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी नागरिकांकडून निषेध करून त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याच्या जनतेचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना बडतर्फ करण्याची व सुधांशु त्रिवेदी यांच्यावर भाजपने कारवाई करण्यासाठीं जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली .
आज गरूड पतसंस्था जवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड, सागरमल जैन, शांताराम गुजर यांच्या नेतृत्वखाली घोषणाबाजी करण्यात येऊन पहूर दरवाजा येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना जोडे मारून प्रतिमा दहन करण्यात आल्या यावेळी माजी जि.प.सदस्य संजय गरूड , सागरमल जैन यांची भाषणे झाली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दिलिप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात रघुनाथ माळी, स्नेहदिप गरूड,नंदकिशोर बारी, प्रविण पाटील, शंतनु गरूड, शंकर इंदरकर, प्रविण गरूड, विलास अहिरे, संजय चिंचोले, मनोज पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, मंगल बिल्होरे गुरुजी, महेश भदाने, मनोज पाटील, प्रदीप धनगर, करुण राजे सुर्वे, श्रीराम काटे, विजय चौधरी, सावजी वानखेडे, कैलास पाटील, धनराज नाथ, गिरीष शिंदे, सुनील शिंपी, अरुण माळी, सुरेश बगळे, विनय गरूड, जगन गुजर, संदीप काबरा व अन्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम