जळगावात तरुणाचा मोबाईल हिसकावत चोरट्याने काढला पळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २१ नोव्हेंबर २०२२ | मोबाईल स्विच ऑफ झाला असून मला तुमचा मोबाईल बोलण्यासाठी द्यावा असे सांगून मोबाईल घेऊन भामट्याने पोबारा केल्याची घटना जळगाव शहरातील बीजे मार्केट परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी येथे अक्षय सुरेश काळवाघे हा तरुण राहत असून बँकेत रोखपाल म्हणून नोकरीस आहे. शनीवारी १९ रोजी धूळे येथे एसबीआय बँकेच्या ज्युनिअर क्लर्क या पदाची परीक्षा देवून तरुण रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगावात आला. शहरातील बी. जे. मार्केट परिसरातील साखला मंगल कार्यालयासमोरुन रात्री ९ वाजता पायी जात असतांना हातात हेल्मेट घेवून एक इसमाने तरुणाला विश्वासात घेवून त्याची विचारपूस केली. तसेच माझा फोन स्विचऑफ झाला असून तुझ्या मोबाईलवरुन फोन करायचा आहे असे त्याने सांगितले. तरुणाने लागलीच आपला फोन त्या इसमाला दिला तो इसम बोलतांना रोडाच्या बाजुला गेला.

 

मोबाईलवर बोलत असलेल्या इसमावर अक्षयला शंका आल्याने तो त्याच्याजवळ गेला. परंतु तो इसम अक्षयचा मोबाईल घेवून मार्केटमध्ये लावलेल्या दुचाकीवरुन पसार झाला.जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like