उपप्राचार्य प्रा.हळपे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
खान्देश लाईव्ह । २५ सप्टेंबर २०२२ । चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे यांना भारतीय जैन संघटनेचा(शाखा चोपडा) आदर्श शिक्षक पुरस्कार माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रम आनंदराज पॕलेस चोपडा येथे संपन्न झाला.याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. शांतीलालजी बोथरा, माजी प्राचार्य डाॕ सुरेश अलिझाड, सुभाषचंद्रजी बरडिया, डाॕ निर्मल टाटिया, निर्मल बोरा, गौरव कोचर आदि उपस्थित होते.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल उपप्राचार्य प्रा. बी एस हळपे यांचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड संदीप सुरेश पाटील , उपाध्यक्ष आशाताई विजय पाटील, सचिव डाॕ. स्मिता संदीप पाटील ,कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. डी बी देशमुख, प्राचार्य डाॕ. डी ए सूर्यवंशी ,तिघं शाखांचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम