“रोज मरे त्‍याला कोण रडे” आयकर विभागावर गुलाबराव पाटीलाची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | अल्‍पसंख्‍यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या छापेमारीवर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

“रोज मरे त्‍याला कोण रडे” अशी परिस्‍थीती झाली असल्‍याची प्रतिक्रीया पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ईडीच्‍या कारवाया रोज पहायला व ऐकायला मिळत आहेत. रोज टीव्‍हीवर बातमी पहायला मिळत आहे. एलसीबीसारखी आता ईडी झाली आहे. जोपर्यंत चालवायचे, तोपर्यंत चालू द्या, तसेच ईडीचा गैरप्रकार केला जात आहे. अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी आपला मोर्चा शिवसेनेकडे वळवला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव. यांच्या माझगाव येथील घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी छापा टाकला. आयकर विभाग अधिकारी सीआरपीएफ जवानांसह सकाळीच यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु केली.

तर दुसरीकडे या छापेमारीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सूचक इशारा दिला आहे. 2024पर्यंत आम्हाला हे सहन करावं लागेल. महाराष्ट्राला सहन करावं लागेल. पश्चिम बंगालला सहन करावं लागेल. उत्तराखंड आणि पंजाबलाही सहन करावं लागेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी देखील दिला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like