जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन
खान्देश लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे करीअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संगणक, माहिती तंत्रज्ञान, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागातर्फे ओपन सोर्स टेक्नोलॉजी अॅन्ड करिअर ओपोर्च्युनिटीज या संकल्पनेवर करिअर मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली.
या वेळी ख्यातनाम संगणक तज्ज्ञ व कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून मुंबई येथील रेड हॅट अकॅडमीच्या मोनिका गुगनानी या उपस्थित होत्या. या कार्यशाळेत त्यांनी रेड हॅट टूल त्यांचे सात कोर्सेस व त्यांच्या सर्टिफिकेशनचे विविध महत्व तसेच भविष्यातील नोकरी व्यवसाय अन् जीवनशैली याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चांदणी निमजे यांनी केले तर आभार श्रद्धा जगताप यांनी मानले.
यावेळी संगणक, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुख सोनल पाटील, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. प्रमोद गोसावी व समन्वयिका प्रा. माधुरी झवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रायसोनी इस्टीट्युटचे अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांची असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नियोजनाची व संयोजनाची जबाबदारी प्रा. स्वाती पाटील, प्रा. शीतल जाधव, प्रा. प्रेम आर्या, प्रा. अंकुर पांडे, प्रा. मयंक नामदेव, प्रा. तुषार वाघ, प्रा. पूजा नवाल, प्रा. लिलकंठ देवांगण, प्रा. शरयू बोंडे यांच्या सहकारीवर्गाने पार पाडली. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूट चे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम