पाचशेच्या बनावट नोटा आढळल्या ; चौघांना अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ११ नोव्हेंबर २०२२ | पाचशेच्या बनावट नोटा चलनात आण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना चोपडा शहर पोलिसांनी गुप्त माहितीवरून अटक केली.

शहरातील हॉटेल सुयोगजवळ गुरुवारी सांयकाळी विजय सुरेश निकुंभ (वय २६, रा.खर्दे, ता.शिरपूर), किरण रमेश शिंदे (वय ३३, रा.सांगवी, ता.शिरपूर), शंकर पुनमचंद वडर (रा.वाडी, ता.शिरपूर) आणि संतोष वडर (रा. शिंदखेडा) यांना ताब्यात घेतले. या चौघा संशयितांकडे पाचशे रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळल्या. नोटा बनावट असल्याचे माहिती असूनही, त्या खऱ्या असल्याचे भासावी त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विजय निकुंभे व किरण शिंदे यांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. तर शंकर वडर व संतोष वडर यांना शिरपूर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांकडून दुचाकी, मोबाईल असा ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like