जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख यांचा नागरी सत्कार

खान्देश लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पहूर येथील भूमिपुत्र अरविंद देशमुख यांची जिल्हा दूध संघ संचालकपदी निवड झाल्याने पहूर येथे त्यांचा नुकताच सर्वपक्षीय नागरी सन्मान करण्यात आला. शेतमजूर ते दूध संचालक असा संघर्षमय प्रवास त्यांचा आहे
यावेळी सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, उपसरपंच कसबे, राजू जाधव, केंद्रीय अन्य सुरक्षा समिती सदस्य रामेश्वर पाटील, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती बाबूराव घोंगडे, विकासो माजी चेअरमन किरण खैरनार, संचालक राजेश लोढा, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्रप्रमुख शैलेश पाटील, मुख्याध्यापक आर. बी. पाटील, माजी उपसरपंच योगेश भडांगे, रोहयो माजी सदस्य किरण पाटील, माजी उपसरपंच रवींद्र मोरे, भाजप अल्पसंख्याक माजी अध्यक्ष सलीम शेख गणी, धोबी समाज अध्यक्ष चेतन रोकडे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, संदीप बेढे, ईश्वर बारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल रायचंद लोढा यांच्यासह जैन समाज बांधवांनी सन्मान केला. तर सूत्रसंचालन शिक्षक गणेश राऊत यांनी केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम