जांभोरा गावाजवळ अपघातात एक ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I तालुक्यातील जांभोरा गावाजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

नरेंद्र राजू बेंडवाल (वय ३१, रा.डीडी नगर पारोळा) हे दि.२३ डिसेंबर रोजी रात्री आपली दुचाकी (क्र.एमएच.१९,डीझेड.६६९६) ने धरणगावहून पारोळा जात होते. धरणगाव ते पारोळा रोडवर जांभोरा गावाजवळ धरणगावकडील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने तेथे पाण्याचे टॅकर उभे होते. रात्री साधारण ११ वाजेच्या सुमारास रस्त्याचे काम सुरु असल्याबाबत सूचना नसल्यामुळे नरेंद्र बेंडवाल यांना रस्त्यावर उभे असलेले टॅकर दिसले नाही. त्यामुळे त्यांची दुचाकीने सरळ टॅकरला धडक दिली. या अपघात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आकाश पचेरवार (रा. रामदेवसजीबाबा नगर , धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दीपक पाटील हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like