दहिवद जि.प. प्राथमिक शाळेला एलसीडी टिव्ही संच भेट
खान्देश लाईव्ह । २ जानेवारी २०२३ । तालुक्यातील दहीवद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला आठ एलसीडी टिव्ही संच भेट म्हणून देण्यात आले.
दहिवद ता.अमळनेर ग्रामपंचायत मार्फत पंधराव्या वित्त आयोगातील गाव विकास आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळेला आठ एलसीडी टिव्ही देण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपसरपंच प्रविण काशिनाथ माळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच देवानंद बहारे, गोकुळ माळील, गुलाब पाटील, शिवाजी पारधी; रवींद्र माळी, पंकज देसले, अनिल भटा माळी, सुवर्णा संदीप माळी, जिजाबराव माळी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर दहिवदकर सर यांनी केले. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांनी आलेल्या पाहुण्यांचा फुल गुच्छ देऊन सत्कार केला .मुख्याध्यापक रमेश पाटील सर यांनी आभार व्यक्त केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम