उप प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे थकीत असलेल्या वाहनाचा लिलाव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | सदर जाहिर नोटीस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये नोदणी तथा कराधान प्राधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारात जारी करण्यात येत आहे. सदर नोटीसव्दारे वाहनमालकांना / ताबेदारांना / विनदात्यांना जाहिररीत्या कर व दंड भरुन वाहने सोडवून घेण्याबाबत अवगत करण्यात येत आहे.

या कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्हयाखाली अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या वाहन मालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोचदेय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. मोटार वाहन कायदा वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकऱ्यास कळविणे बंधनकारक असतांना देखील सदर वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही. त्यासाठी हि जाहीर नोटीस जारी करण्यात येत आहे.

वाहनांच्या मालकांनी / ताबेदारांनी / वित्तदात्यांनी लिलावाच्या दिनांकपर्यत या कार्यालयात थकीत कर पर्यावरण कर शासकीय दंडाच्या रक्कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास दिनांक 14 डिसेंबर, 2022 पर्यंत लेखी हरकत घ्यावी. अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलावा हा ई- लिलाव पध्दतीने दिनांक 15 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 4 वाजता करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

4. सदर ई-लिलावामध्ये इच्छुक बोलीदारांना सदर सूचना प्रसिध्द करण्यात येत असून त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

5. ई-लिलाव पध्दतीने आवश्यक संक्षिप्त नमूद संकेत स्थळावर उपलब्ध आहे. http://www.eauction.gov.in

6. ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छित असलेल्या बोलीदारांनी http://www.eauction.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक दस्ताऐवजांची ऑनलाईन तसेच ऑफलाईन पूर्तता करावी. (मुळ पॅनकार्ड व आधारकार्डची साक्षांकित प्रत तसेच वस्तू आणि सेवा कर (GST) नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र इ.

जाहीर ई-लिलावात भाग घेणाऱ्या इच्छुकांनी एकूण 14 (चौदा) वाहनांकरिता, खबरदारी ठेव रक्कम (Caution Maney Deposit) Dy.R.T.O. Jalgaon (payable at SBI Main Branch, Jalgaon) या नावे रुपये 70,000/- रक्कमेचा धनाकर्ष (डीमांड ड्राक्ट) रिजर्व बैंकेच्या नियमाच्या सीटीएस मानांकाप्रमाने दिनांक 1 डिसेंबर, 2022 ते 9 डिसेंबर, 2022 रोजी इतर सर्वात प्रति सकाळी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयात जमा करुन नोंदणी करावी.

8. जाहीर लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी, अटकावून ठेवलेले स्थळ लिलावाच्या अटी व शर्ती http://eauction.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या आहेत. लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. असे कराधान प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like