भडगाव येथे महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | भडगाव शहरातील एका भागात राहणारी ४७ वर्षीय महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यावर महिलेला जखमी करून आगपेटीने पेटवून देवून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव शहरात ४७ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी महिला शहरातील कोठली रोडवरील एका केंद्राच्या पाठीमागून जात असतांना एक अनोळखी अंदाजे ५० वर्षीय व्यक्ती महिलेजवळ आला. ‘मला संबंध करू दे’, असे म्हणून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महिलेने विरोध केल्यानंतर तिला जमीनीवर पडून जखमी केले. तर तिला आगपेटीने पेटवून देत जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर परिसरातील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमी महिलेला भडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. महिलेच्या जबाबावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like