अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून नेले पळूवून, अनेक वेळा केले अत्याचार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १२ मार्च २०२२ | जळगाव शहरातील धरणगाव येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे चोपडा बसस्थानकातून अपहरण केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली. माहिती नुसार तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यावरून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. असे अनेक धक्कादायक प्रकार समाजात घडत आहेत.

जळगावात धरणगाव शहरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. दि.१७ फेब्रुवारी रोजी अल्पवयीन मुलगी ही चोपडा येथे आपल्या आई-वडिलांसह आली असता संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील रा.संजय नगर धरणगाव बसस्थानकातून पळवून नेले.संशयित आरोपी याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत चोपडा तेथून निघून गेला. या प्रकरणामुळे समाजात आणि परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.

पुढे त्याने अनेक शहरात, गुजरात आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात नेऊन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पीडितेच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात संशयित दीपक हिरामण पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment