खान्देश लाईव्ह | २९ मार्च २०२२ | जळगावात चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जळगाव या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.
जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील मामाकडे भेटण्यासाठी आली होती. अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून पळवून नेत असल्याच्या घटना वाढतच आहे. दरम्यान गुरूवार २४ मार्च रोजी सकाळी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
पडित मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी चौकशी केली असता मामाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील करीत आहे.