पोलिसांच्या ताब्यातून आरोपींने धावत्या गाडीतून मारली उडी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ३१ मार्च २०२२ | चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी ट्रान्सफर वारंटमध्ये ताब्यात घेतलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका मारत धावत्या गाडीतून पळ काढला आहे. सायंकाळी जळगाव शहरातील जैन इरीगेशनजवळ घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू करण्यात आला. राजू विक्रम खांडेलकर 20, रा.महालखेडा, ता.मुक्ताईनगर असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. भुसावळ शहर पोलिसात गुरनं. 41/2022, भादवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातीळ आरोपी नराजू विक्रम खांडेलकर 20, ट्रान्सफर वॉरंट घेऊन धुळे जिल्हा कारागृहातून पोलीस नाईक जाकिर मंसुरी, ताब्यात घेऊन भुसावळ येथे बुधवारी घेऊन जात होते.

मात्र जैन इरीगेशन कंपनी, जळगाव धरणगाव पोस्ट हद्द आल्यानंतर पोलिसांच्या हाताला झटका मारत आरोपीने चालत्या वाहनातून उडी टाकून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस कर्मचारी देखील भांबावले व त्यांनी काही अंतरापर्यंत आरोपीचा पाठलाग केला. मात्र रात्रीच्या अंधारात आरोपी गायब झाल्याने रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. दरम्यान, पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment