रेल्वेतून पडलेल्या महिलेचे पोलिसाने वाचवले प्राण, उपअधीक्षकांनी केला गौरव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | जळगाव चाळीसगाव येथे जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी दिनेश विश्वनाथ बडगुजर यांनी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्नात अपघात होण्यापूर्वी महिलेचे प्राण वाचवले. अश्या अनेक घटना मुंबईत रोज घडत असतात. परवास करताना  सावध रहावे लागते. घडलेल्या प्रकाराची माहिती सर्वत्र पसरली.

चाळीसगाव १५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेस प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनवर आल्यानंतर सुनीता पांडुरंग बेडीस वय ५२, या चाळीसगाव येथे पतीसह रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होत्या. ही घटना १५ राेजी सायंकाळी ७.३० वाजता प्लॅटफाॅर्म क्रमांक दोनवर घडली. गाडीचा वेग वाढल्यामुळे सुनीता यांना चढता न आल्याने त्या पाय घसरून कोसळल्या.

प्लॅटफाॅर्मवर हजर असलेल्या बडगुजर यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून सुनीता यांना ओढून बाहेर काढले. सेकंदाचाही उशीर झाला असता तर धक्कादायक घटना घडली असती. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना रुळाजवळ पडलेल्या महिलेस ओढून बाहेर काढत तिचे प्राण एका पोलिसाने वाचवले.

यांनी महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक कुमार चिंथा, उपअधीक्षक (गृह) विठ्ठल ससे यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन गौरव केला.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment