२५ लाखांसाठी विवाहितेचा छळ ; नशिराबाद पोलिसांत गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ |विवाहितेने माहेरहून २५ लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असणाऱ्या माधवी अतुल बढे (वय-३३) यांचा विवाह पुणे येथील अतुल लीलाधर बढे यांच्याशी रीतिरिवाजनुसार झाला. मात्र लग्नाच्या काही दिवसानंतर पतीसह सासू सासर्यांनी माहेरहून २५ लाख रुपये आणावेत अशी मागणी करून तिचा तसेच मारहाण केल्याने कंटाळून विवाहिता माहेरी आली २५ ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस स्टेशनला पती अतुल बडे, सासरा लीलाधर बढे, नांदोई दिनकरराणे, नणंद सुनिता राणे, भाची सायली दिनकर सर्व रा. रूपानगर पुणे यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like