किन्ही येथील घरातून ८ हजार रुपयांची रोकड चोरली
खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I जामनेर तालुक्यातील किन्ही येथील घरातून ८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार मध्यरात्री घडला आहे. याबाबत बुधवारी ७ डिसेंबर रोजी रात्री पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील किन्ही येथे प्रभाकर दुर्योधन सुरवाडे (वय-45) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ नोव्हेंबर रोजी रात्री सर्वजण झोपलेले असतांना गावातील फिरोज सुपडू तडवी याने घरात प्रवेश करून कोठीचे कुलूप तोडून ८ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रभाकर दुर्योधन सुरवाडे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी फिरोज सुपडू तडवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रवीण चौधरी करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम