पाचोरा तालुक्यातील ३ गुन्हेगार वर्षभरासाठी हद्दपार
खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात व परिसरात दहशत पसरवून वेगवेगळ्या ६ गुन्ह्यातील तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी १ वर्षाकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहर व शहरानजीच्या गावांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या दाखल असलेल्या ६ गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेले सलमान बल्लू पिंजारी (वय-२३), शाहरुख शेख लाल शेख (वय-२६) आणि शेख फिरोज शेख नाझीर पिंजारी (वय-३०) सर्व रा. कुर्बान नगर, पाचोरा यांच्या विरोधात हद्दपारचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांच्याकडे पाठवण्यात आला होता. पाचोरा शहरात शांतता अबाधित राहावे, या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक एस. राजकुमार यांनी तिघांचा हद्दपारचा प्रस्ताव मंजूर करून तिघांना १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहे. अशी माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी बुधवार ७ डिसेंबर रोजी सायंकाळी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम