अखेरच्या दिवसापर्यंत 1013 उमेदवारांची माघार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 1208 जागांसाठी 2179 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत 1013 उमेदवारांनी माघार घेतली असून 55 अर्ज बाद ठरविण्यात आले आहे.

जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतींसाठी दि. 18 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीमधील 1208 जागांसाठी 3201 उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले होते. तर सरपंच पदाच्या 140 जागांसाठी 656 जणांनी उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. छाननीनंतर बुधवारी अर्ज माघारीची अंतीम मुदत होती. त्यात सदस्यपदासाठी 1013 उमेदवारांनी तर सरपंचपदासाठी 279 उमेदवारांनी माघार घेतली.

आता 1208 जागांसाठी 2179 उमेदवार रिंगणात आहेत. तर सरपंचपदाच्या 140 जागांसाठी 376 उमेदवार रिंगणात कायम आहेत. दि. 18 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने प्रचाराला उमेदवारांनी सुरूवात केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like