सरपंच विकासाकरिता सक्रिय असला पाहिजे – ना. गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ७ नोव्हेंबर २०२२ | ग्रामपंचायतीचा सरपंच हा कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या जातीचाआहे यापेक्षा गावाच्या विकासासाठी तो किती सक्रीय आहे यावर गावाचा विकास अवलंबून असतो. जिल्ह्यात विकासकामे करीत असतांना मतदारसंघातही सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधींची कामे मंजूर आहेत. शेती रस्ते दर्जोन्नात करून शेतकरी हितासाठी शेत रस्ते डांबरीकरणावर अधिक भर दिलेला आहे. जनतेच्या प्रेमाला व विश्वासाला तडा जावू देणार नाही. विकास कामांच्या भरोसे जनतेसमोर जाणार असून फुपनगरी वासीयांच्या सत्काराने भारावलो असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फुपनगरी येथे आयोजित जाहीर सभेत केले.

सभेला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
फुपनगरीत प्रवेश करताच हजारो गावकरी ना. गुलाबाराव पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. महिलांनी गावाच्या बसं स्थानाकांपासून ते कार्यक्रमस्थळा पर्यन्त आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा दिवे लावून रोषणाई केली होती. ठिक – ठिकाणीकाणी असंख्य महिलानी गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. जागोजागी स्वागत बॅनर लावण्यात आले होते., पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताश्यांच्या गजरात जल्लोषात व मोठ्या उत्साहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे ना. गुलाबराव पाटील भारावून गेले. सभेला गावातील ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला हे विशेष
याप्रसंगी जि. प. चे समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, पं. स.चे माजी सभापती जनार्दन कोळी- पाटील, फुपनगरीचे माजी सरपंच व आयोजक जितेंद्र अत्रे, सरपंच कु.प्रियंका सोनवणे, उपसरपंच महेश अत्रे, भास्कर सोनवणे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास चौधरी, लक्ष्मण पाटील (लकी टेलर), उपसभापती सुरेश पाटील, संचालक अनिल भोळे, भरत बोरसे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जि. प. सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, भाजपाचे प्रभाकर आप्पा पवार, पं. स. सदस्य हर्षल चौधरी, डॉ. कमलाकर पाटील, भाजपा युवा मोर्चाचे सचिन पवार, शेतकी संघाचे उत्तम सपकाळे, मच्छिंद्र पाटील मुरलीधर पाटील, जगदीश सपकाळे, नवल सोनवणे, अण्णाभाऊ सपकाळे, विलास चौधरी (किटू नाना), दिलीप जगताप परिसरतील सरपंच, उपसरपंच ,ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक माजी सरपंच जितेंद्र अत्रे, सरपंच कु. प्रियंका सोनवणे, उपसरपंच महेश अत्रे, भास्कर सोनवणे, ग्रा.पं. सदस्य युवराज पवार, अविनाश नेरकर, सौ. गुंफाबाई भालेराव, सौ. भारती सोनवणे, सौ. योगिता जाधव, राहुल जाधव, सौ. हेमलता जाधव, सुनील चव्हाण, सिताराम सपकाळे, किशोर अत्रे, सुजित अत्रे, रतिलाल बडगुजर, विजय चौधरी, दिग्विजय चौधरी, सतीश जाधव, उमाकांत मोतीराया, सागर भालेराव, भरत सोनवणे, दगडू चौधरी, उत्तम अहिरे, कबीर पटेल, तुराप शाह, हरी कांबळे यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी प्रयत्न केले.

या कामांचे झाले लोर्पण व भूमिपूजन
२ कोटी ४० लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यात फुपनगरी ते वडनगरी रस्त्याचे पूलांसाह डांबरीकरण करणे (७६ लक्ष ), फुपनगरी ते दोनगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे (४२ लक्ष ), गाव अंतर्गत बडगुजर गल्लीत डांबरीकारण करणे (१० लक्ष) जल जीवन मिशन अंतर्गत पा. पू. योजना (२० लक्ष) तसेच पेव्हिंग ब्लोच्क बसविणे (३१ लक्ष ), मरिमाता मंदिरालगत नाल्याला संरक्षण भिंत बांधकाम करणे (१० लक्ष), फुपनगरी ते आंधळे शेत रस्त्याचे डांबरीकरण करणे (५० लक्ष) या कामांचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांचे बहारदार सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील सर यांनी केले. तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी मानले.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like