डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शन आता भाऊंच्या उद्यानात
‘
खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | एका भारतीय व्यक्तीचा जगातील 120 पेक्षा अधिक देश सन्मान म्हणून टपाल तिकीट काढतात. ती 120 देशांतील मुळ टपाल तिकीटे गांधी रिसर्च फाउंडेशनकडे उपलब्ध आहे ही जळगावकरांसाठी मोठी गौरवाची बाब असून या तिकीटांचे गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे आयोजन महात्मा गांधी उद्यान करण्यात आले होते. त्याला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गांधी जयंती पंधरवाड्यात जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून आयोजीत हे प्रदर्शन खास जळगावकरांच्या आग्रहास्तव भाऊंचे उद्यान येेथे प्रदर्शीत करण्यात आले आहे. वानखेडे गॅलरीमध्ये दि. 18 ते 23 ऑक्टोबर पर्यंत भाऊंच्या उद्यानाच्या वेळेत सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 5 ते 9 वाजेदरम्यान पाहता येईल.
पोस्टाच्या स्टॅम्पवर महात्मा गांधीजींच्या वेगवेगळ्या विषयांवर स्टॅम्प निघालेली आहेत. जगात महात्मा गांधीजी हे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांचे इतक्या देशांमध्ये तिकिटे आहेत. महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून जळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘डाक टिकटों में महात्मा’ या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी मोटार वाहन, ट्रॉफीक चलान, भूसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटलांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे संपुर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जळगाव येथील औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर खटले ठेवण्यात आले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोक अदालतीध्ये राष्ट्रीयकृत बॅका, कंपन्या यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवून मिळण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यामध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सुट देण्याबबात प्रस्तावित केलेले आहे. याचा नागरीकांनी लाभ घ्यावा.
ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायची असतील. अशा संबधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावेत. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवावयाचे असतील त्यांनी सुद्धा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त खटले या राष्ट्रीय लोक अदालतीत सामोपचाराने निकाली काढावेत. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम