श्रीक्षेत्र पाडळसरे येथे उद्या पार पडणार नाटेश्वर महादेवाची यात्रा उत्सव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | जळगाव येथील दि.२६ फेब्रुवारी रोजी पाडळसरे ग्रामस्थांचे‎ आराध्य दैवत असलेल्या ‘नाटेश्वर’ महादेवाचा‎ यात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या यात्रा उत्साहात सर्व एकत्र येऊन आनंद साजरा करतात तसेच देवाला त्याचा मान दिला जातो. वर्षात एकदा ही यात्रा नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी भरते.

सुर्यकन्या तापी, अनेर व बोरी‎ नदीच्या त्रिवेणी संगमस्थळी, दक्षिण‎ तीरावर श्रीक्षेत्र पाडळसरे ग्रामस्थांचे‎ आराध्य दैवत, पुरातन जागृत‎ देवस्थान नाटेश्वर महादेवाचा‎ यात्रोत्सव, माघ कृष्ण दशमी‎ म्हणजेच शनिवारी साजरी होणार आहे.‎ या ठिकाणी पुर्वीपासून‎ महादेवाला दाल बट्टीचा शाकाहारी‎ नैवेद्य गावातील घराघरातून अर्पण‎ केला जातो.

भाविकांच्या नवसाला‎ पावणारे जागृत शिवलिंग म्हणून‎ द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी एक‎ प्रतीनाटेश्वर महादेवाचे शिवलिंग व‎ मंदिर आहे. हे मंदिर विलोभनीय असून काळ्या‎ दगडांनी हेमांडपंथी बांधकाम आहे.‎
कोरीव आरेखन घुमटाच्या वर चार‎ उपदिशांना वाघाच्या मूर्ती व त्यावर‎ कळस आणि भागवत धर्माची‎ पताका आहे. मंदिरात पाषाण शिळा‎ त्यात लिंग हे संगमरवरी आहे.

यात्रोत्सवाच्या निमित्ताने पाडळसरे‎ ग्रामपंचायतीकडून लोकनाट्य‎ तमाशाचे आयोजन करण्यात आले‎ आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिर‎ परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई‎ करण्यात आली आहे. धुळे‎ व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर‎ चोपडा, शिरपूर व अमळनेर या तीन‎ तालुक्यांच्या सीमेवर हे मंदिर आहे.‎ यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like