ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | राज्यातील पोलिस दलासाठी राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण शासन निर्णयाला आज शुक्रवारी मजुरी मिळाली आहे.या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

हजारो पोलीस हवालदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणाचा निर्णय शासन आज घेणार असल्याची माहिती गृहमंत्र्यालयाकडून देण्यात आलीय.मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं पोलिसांच्या पदोन्नतीबाबत महत्वाचा निर्णय घेतला होता. पोलिस पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव गृहविभागाने तयार केला होता.
पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार असून याचा फायदा भविष्यात हजारो पोलिस शिपाई, हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक यांना होणार आहे.

शिवाय पोलिस दलास सद्यःस्थितीत प्रत्यक्ष कामकाजासाठी मिळणाऱ्या मानवी दिवसांमध्येही मोठी वाढ होईल. तर पोलिस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवाकालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल.
शिपाई, हवालदार, उपनिरीक्षकांची पदे वाढणार
याशिवाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदोन्नती साखळी मधील पोलीस नाईक या संवर्गातील 38 हजार 169 पदे व्यपगत करण्यात आली.

पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहे. या निर्णयामुळे आता पुनर्रचनेनंतर पोलिस शिपायांची पदे 1 लाख 8 हजार 58, पोलिस हवालदारांची पदे 51 हजार 210, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे 17 हजार 71 वाढतील. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like