रोटरी क्लब जळगाव तर्फे वॉटर फिल्टर, कुलर भेट

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ एप्रिल २०२२ | जळगाव येथील रोटरी क्लब जळगाव तर्फे डोमगावच्या आश्रम शाळेला वॉटर फिल्टर व वॉटर कुलर भेट देण्यात आले. त्यासाठीचे प्रायोजकत्व रोटरीचे अध्यक्ष संदीप शर्मा यांनी त्यांच्या आई स्व.सौ. शशिकिरण शर्मा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केले.

शाळेतील मुलांना माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके व स्वाती ढाके यांच्याकडून चॉकलेट व नेलकटरचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी क्लबचे मानद सचिव मनोज जोशी, माजी अध्यक्ष डॉ. जयंत जहागीरदार, माजी अध्यक्ष डॉ. तुषार फिरके, डॉ. काजल फिरके, डॉ. सुनील सूर्यवंशी आदि पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like