निखिल एकनाथरावजी खडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गरीब व फुथपात वर निवास करणाऱ्या १०३ भिक्षुक लोकांना वॉटर बॉटल वाटप

बातमी शेअर करा

दि. १ मे रोजी स्व. निखिल एकनाथरावजी खडसे यांच्या स्मृतीदिनानिमित्त स्टेशन रोड जळगाव येथे गरीब, फुथपात वर निवास करणाऱ्या १०३ भिक्षुक लोकांना नाथ फाऊंडेशन जळगाव च्या वतीने वॉटर बॉटल वाटप करण्यात आल्या.

तीव्र उन्हात तहान भागवण्याकरीता गरीब व भिक्षुक लोकांना पाणपोई वरील थंड पाणी स्वत:जवळ साठवुन बाळगता येऊ शकत व सतत उन्हात भटकंती करत असलेल्या गरीब लोकांना हव तेव्हा पाणी पिता याव हा यामगचा उद्देश्य नाथ फाऊंडेशन जळगाव ने मनाशी बाळगुन सदरील उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगाव महानगर चे अध्यक्ष तथा मा.नगरसेवक अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, नगरसेवक सुनिलभैय्या माळी, नाथ फाऊंडेशन जळगाव चे कार्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर, रमेशजी बारे, मा.नगरसेवक राजुभाऊ मोरे, अनिल पवार, इब्राहिम तडवी, अशोक सोणवने, विषाल देशमुख, संजय जाधव, धिरज काबरा, राजु बाविस्कर, इस्माईल शहा व इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like