जमावबंदी आदेशाचे उल्लंघन ; २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत मोर्चा काढल्याप्रकरणी २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यात जा.क्र. दंडप्र/ १/कावि/ २०२२/२/ १२८, दि. ९ डिसेंबर २०२२ अन्वये दि. १० डिसेंबर २०२२ ते दि. २४ डिसेंबर २०२२ पावतो महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ३७ (१) (३) चे आदेश (जमावबंदी आदेश) लागू केले आहेत. असे असतांना देखील पाळधी दुरक्षेत्र येथे पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढून जमाव पाळधी दुरक्षेत्र येथे आणून शासकिय कामात अटकाव आणला म्हणून शेख सलीम शेख गनी कुरेशी,समद अब्दुल रहमान शेख (दोघं रा. पाळधी ता. धरणगाव) यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. अरुण निकुंभ हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like