धावत्या रेल्वेतुन पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I धावत्या रेल्वेतुन पडल्याने सुमारे ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज २ डिसेंबर रोजी पहाटेपाचोरा ते परधाडे रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३ / ३ डाऊन लाईन नजीक घडली उघडकीस आली . .

पाचोरा लोहमार्ग दुरक्षेत्र पोलिस स्टेशनचे ए. एस. आय. गोपाळकृष्ण सोनवणे हे रुण्गवाहिका चालक अमोल पाटील यांच्यासह घटनास्थळी जावुन पंचनामा केला. मयताचे अंदाजे वय ४० वर्ष असुन मयताचे अंगावर निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, काळे – पिवळे पट्टे असलेला टि – शर्ट आढळुन आला आहे. मयताचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून मयताबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा रेल्वे पोलिसांनी केले आहे. घटनेचा पुढील तपास ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. गोपाळकृष्ण सोनवणे हे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like