दुचाकी ओमनीचा अपघात ; चोपड्याचे दोन जण ठार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १६ नोव्हेंबर २०२२ | भरधाव वेगात धुळेकडे जाणाऱ्या ओमनी गाडीने धरणगाव कडून चोपड्याकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर ओमनी गाडीतील बसलेले सहा प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना दि.१५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मजरेहोळ फाट्याजवळ घडली. गंभीर जखमीपैकी एकाला जळगावला हलविण्यात आले आहे. तर दुचाकी वरील दोन्ही मयत चोपडा शहरातील रहिवाशी आहेत.

ओमनी गाडी क्रमांक-एमएच-१८डब्ल्यू ७९८७ ही सहा प्रवाशांना घेऊन रात्री ८:४५ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने चोपडयाकडून धुळेकडे जात होती. यावेळी कॉन्ट्रॅक्टर असलेले अकसर इरफान काझी (४८) रा. दर्गाअळी चोपडा शेख अनिस शेख जुहूर (४६) रा. मण्यारअळी चोपडा हे दोन्ही जण दुचाकी क्रमांक-एमएच १९ सीएल- ७२४१ वर धरणगाव येथील कामे आटोपून रात्रीच चोपड्याकडे येत होते.ओमनीची दुचाकीला जोरदार धडक : दोघे जागीच ठार तर सहा प्रवाशी गंभीर जखमी

दरम्यान मजरेहोळ फाट्या जवळ समोरून धुळेकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ओमनी क्रमांक -एमएच-१८ डब्ल्यू ७९८७ या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली यावेळी झालेल्या गंभीर अपघातात दुचाकीवरील अकसर इरफान काझी व शेख अनिस शेख जुहूर हे दोन्ही जण जागीच ठार झाले तर अपघातात ओमनी गाडी देखील पलटी झाल्याने गाडीतील प्रवाशी सागर साहेबराव पानपाटील (२७),राहुल अनिल घोडे (३०),अविनाश युवराज बोरसे (३०),दीपक मारुती धतेले (३०),आकाश राजाराम सावळे (२८) सर्व राहणार वाडीभोकर ता.जि.धुळे,अजय मगन मोरे (३०),राहणार नकाने ता.जि.धुळे हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like