दंगलीप्रकरणात जाखनी नगराच्या दोघांना अटक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I जुन्या वादातून जाखनीनगर येथे दोन कुटूंब एकमेकांना भिडून दंगड घडली होती. याप्रकरणी एका कुटूंबातील दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी गुरूवार १ डिसेंबर रोजी रात्री उशीरा दुपारी २ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली आहे.
जयेश दिलीप माचरे (२३) व कपिल दिलीप बागडे (३२) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
जाखनीनगर येथे सावन बागडे हे नातेवाईकांसह २७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घराबाहेर बसले होते. त्यावेळी जयेश माचरे, शशिकांत बागडे, कार्तिक बाटूंगे, आकाश माचरे, कपिल बागडे, अर्जुन माचरे, रोहित माचरे, दीपमाला बाटूंगे, तमन्ना माचरे, ऋतिक बागडे, राहुल माचरे, नीलेश माचरे, दीपशा भाट, रत्नाबाई बागडे यांनी यांनी सावन बागडे यांना शिविगाळ करून त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या घरातील सामानाची तोडफोड केली. नंतर चारचाकी वाहनाचे नुकसान केले होते. याबाबत सावन बागडे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित जयेश माचरे व कपिल बागडे यांना तांबापूरा परिसरातून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किरण पाटील, इमरान सैय्यद, किशोर पाटील, सुधीर साळवे यांनी गुरूवारी रात्री अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती त्यांनी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like