रायसोनी महाविद्यालयातर्फे शहीद दिनानिमित्त विध्यार्थ्यानी सादर केला श्रद्धांजली कार्यक्रम

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | रायसोनी महाविद्यालयातर्फे शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणारे थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा स्मृती दिन हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो.यावेळी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित मूकनाट्य विध्यार्थ्यानी सादर केले.

या निमित्ताने भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांनी देशासाठी दिलेले बलिदान व आदींचे वास्तवरूपी चित्र विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात मूकनाट्याच्या माध्यमातून मांडले. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वास्तविक दर्शनाने व विविध गीते सादर करत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यावेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा उपस्थित होते.

मूकनाट्य व गीत सादरीकरणात सुयश पाटील, साक्षी जैस्वानी, लीना जैन, गोविंद झा, विवेक पाटील, भूषण अडकमोल, धवल वायकोळे आदी विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.शहीद दिनाच्या ओचीत्याने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट मूकनाट्याचे प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले. तसेच म्युझिक क्लबचे अक्षय दुसाने व वसिम पटेल यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like