भुसावळातील युवकांचा गोव्यातील समुद्राच्या लाटेत बुडून मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २४ मार्च २०२२ | भुसावळातील तरुणाचा मित्रांसोबत गोवा फिरण्यासाठी गेलेल्या समुद्रात बुडून मृत्यू झाला. गुरूवार, 24 मार्च रोजी सकाळी मृत तरुणावर भुसावळात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

भुसावळातील रींग कंपनीत अभियंता असलेला व भुसावळातील रहिवासी असलेला विवेक शनिवारी मित्रांसोबत गोवा येथे फिरायला गेला होता. विवेक सुरेश मुराई वय 25, गडकरी नगर, भुसावळ येथे असे मयताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. त्याचे काही अन्य मित्र देखील येणार आहे.

मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास विवेक याने त्यांच्या आईशी संपर्क ख्यालीखुशाली चौकशी केली. दुपारी बाराच्या सुमारास तो समुद्रातील पाण्यात गेला असता लाट आल्यानंतर वाहून गेला व त्याला बाहेर काढण्यात यश आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
विवेकच्या पश्चात त्याची उच्च शिक्षित बहिण व आई असा परीार असून मृतदेह गुरुवारी पहाटे शहरात आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like