अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २१ डिसेंबर २०२२ I वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नसतांना चोरटी वाहतूक करतांना जळगाव तालुका पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टरला पकडले. यासंदर्भात मंगळवार २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की, गिरणानदीतून बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा करून चोरटी वाहतूक मोठ्याप्रमाणावर होत आहे. निमखेडी शिवारातून मंगळवारी २० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असतांना जळगाव तालुका पोलीसांनी ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना असल्याची विचारणा केली असता ट्रॅक्टर चालकाने उडवाउडविची उत्तरे दिली. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक रिजवान शेख फारूख (वय-२०) रा. पाळधी ता.धरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेद्र पाटील करीत आहे.

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like