आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस. महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
खान्देश लाईव्ह | ८ मार्च २०२२ | मेष : आज चंद्र राहू तुमच्या आत्मसन्मान आणि नावलौकिक यामध्ये भर टाकेल. शुभ शुक्राचे गोचर आनंद देईल. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक समारंभ होतील. दिवस शुभ.
वृषभ : आर्थिक भरभराट, कौटुंबिक सुख, आनंद, प्रवास असा हा दिवस आहे. भरपूर काम करून झाल्यावर विश्रांती मिळेल. उत्तम दिवस.
मिथुन : व्यय चंद्र राहू भ्रमण गुरूशी केंद्र योग करीत आहे, उच्च प्रतीचे अध्यात्मिक, सामाजिक अनुभव येतील. घरात भरपूर वेळ घालवाल. दिवस चांगला जाईल.
कर्क : लाभात चंद्र आणि गुरू काही विशेष अनुभव देतील. आर्थिक बाजू भक्कम राहील. मन स्थिर होईल. मित्र मंडळ भेटेल. दिवस मध्यम.
सिंह : आज चंद्र राहू खूप काम मिळवून देईल.जोडीदार आनंदी राहील. तसेच संतान सुख लाभेल.
कन्या : आज चंद्र भाग्य स्थानात आहे, तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात याल. आदर आणि सन्मान वाढेल.
तूळ : आज चंद्र राहू मध्यम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. संतती, शिक्षण आणि धार्मिक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. प्रकृती जपा. दिवस मध्यम.
वृश्चिक : आज जपून राहण्याचा दिवस. चंद्र राहू प्रकृतीसंबंधी तक्रारी निर्माण करेल. घरामध्ये काही विशेष घटना घडतील. जोडीदार आनंदी राहिल दिवस शुभ.
धनु : आज जीवनातील एक चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात देखील चांगला अनुभव देईल. गुरू चंद्र योग शुभ फळ देईल. दिवस आनंदात जाईल.
मकर : शनि बुध काही अॅलर्जीचे विकार निर्माण करतील. प्रकृतीकडे लक्ष द्या. संतती सुख मिळेल. नातेवाईक भेट संभवते. आर्थिकदृष्ट्या मध्यम दिवस.
कुंभ : गुरू चंद्र योग आज आनंदात दिवस घालवा, असं सुचवत आहे. संततीकडे लक्ष द्या. धार्मिक स्थानाला भेट देण्याचे योग.
मीन : आज चंद्र गुरू केंद्रयोग आर्थिक लाभ घडवेल. घरामध्ये काही आनंदी घटना, पूजा घडतील.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम