तीन गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून १ वर्षांसाठी हद्दपार

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तीन गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून १ वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई गेल्या दोन आठवड्यापासून सुरू आहे. गुरूवारी २२ डिसेंबर रोजी सात गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले. तर शुक्रवार २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गुन्हेगार सागरसिंग जीवनसिंग जुन्नी (वय-२८), रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (वय-२५) आणि शक्तीसिंग उर्फ हग्गू जीवनसिंग जुन्नी (वय-२८) तिघे रा. राजीव गांधी नगर जळगाव या तीन गुन्हेगारांना एक वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करावे, असे आदेश काढले आहे. दरम्यान या तिघांवर चोरीचे, हाणामारीचे आणि धारदार शस्त्र वापरून वापरून दमदाटी केल्याचे एकुण ७ गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगान जळगाव जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी हद्दपारचे कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like