अनुभूती स्कूल ला ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड’

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १४ ऑक्टोबर २०२२ | ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग (EWISR 2022-23) मध्ये अव्वल पाच क्रमांकावर असलेल्या शाळांनी ‘शैक्षणिक प्रतिष्ठा’, ‘नेतृत्व, व्यवस्थापन गुणवत्ता’ आणि ‘शिक्षक कल्याण आणि विकास’, ‘पैशाचे मूल्य’ या श्रेणीमध्ये सर्वाधिक गुण मिळविले. यात अनुभूती स्कूल द्वारे शैक्षणिक विकासातून सामाजिक समृद्धीच्यादृष्टीने केल्या गेलेल्या विशेष प्रयत्नांमुळे सर्व सहनिवासी शाळा (को-एड बोर्डिंग) श्रेणीत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक तर भारतातून पाचव्या क्रमांकाचे रॅंकिंग मिळाले असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘एज्युकेशन वर्ल्ड्स इंडिया स्कूल अवॉर्ड्स 2022-23’ ने सन्मानित करण्यात आले.

 

हा भव्य पारितोषिक सोहळा दिल्ली, गुरूग्राम येथील हॉटेल लीला अँबियन्स इथे पार पडला. अनुभूती स्कूलचे ज्येष्ठ शिक्षक श्री. यु. व्ही. राव यांनी अनुभूती स्कूलच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी क्रिकेटपटू श्री. जतीन परांजपे, दिल्लीस्थित करिअर कौन्सिलिंग माईंडलर कंपनीचे संस्थापक श्री. प्रतिक भार्गव यांची उपस्थिती होती.

ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग हे भारतातील शीर्ष आणि सर्वोत्तम शाळा एज्युकेशन वर्ल्ड सी फोरच्या सहकार्याने, एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग (EWISR) 2022-23 सादर करते जे 300 हून अधिक शहरांमधील भारतातील सर्वोत्तम आणि सर्वोच्च शाळांचे विश्लेषण करून रेटिंग करते आणि श्रेणी देते. ईडब्ल्यू इंडिया स्कूल रॅंकिंग (EWISR 2022-23) संकलित करण्यासाठी 11,458 नमुना प्रतिसादकर्ते – शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, SECA (सामाजिक-आर्थिक श्रेणी अ) पालक आणि वरिष्ठ शालेय विद्यार्थी – देशभरातील 28 शहरांमध्ये चार महिन्यांच्या कालावधीत 118 सी फोर फील्ड संशोधकांनी मुलाखती घेतल्या. (जून-सप्टेंबर) वार्षिक EWISR हे जगातील सर्वात मोठे शाळा रँकिंग सर्वेक्षण आहे. यामध्ये सर्व सहनिवासी शाळा (को-एड बोर्डिंग) श्रेणीत टॉप 5 मध्ये स्थान पटकाविले. अनुभूती स्कूलला ‘एज्यूकेशन वर्ल्डस इंडिया स्कूल अवॉर्डस’ ने महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांने तर भारतातील पाचव्या क्रमांची शाळा म्हणून सन्मानीत करण्यात आले.

निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता 5 वी ते 12 पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूतीमध्ये औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कारमूल्ये रूजविले जातात. ज्यामुळे स्पर्धायुक्त जगातसुद्धा अनुभूतीचे विद्यार्थी आपली वेगळी छाप सोडण्यास सक्षम आहेत. 2020-2021 शैक्षणिक जागतिक क्रमवारीत, केंद्र आणि राज्य सरकारी शाळांमध्ये अनुभूती 15 क्रमांकाच्या रॅकिंग होते. पहिल्यांदाच भारतातील पहिल्या पाचमध्ये तर महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थानावर अनुभूती स्कूल ला बहुमान मिळाला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापनाची तळमळ यामुळेच ही रॅकिंग शक्य झाल्याचं मत अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी व्यक्त केलं आहे.

अनुभूती स्कूलला मिळालेला सन्मान अभिमानास्पद बाब – अतुल जैन,

चेअरमन, अनुभूती स्कूल

विद्यार्थ्यांना केवळ औपचारिक शिक्षणात पारंगत होण्यापेक्षा सर्वांगिण अनुभवाधारित शिक्षणाचा मार्ग दाखविणाऱ्या अनुभूती स्कूलला मिळालेला सन्मान हा जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. गुणवत्तेसह सर्वांगिण विकासावर भर देत शैक्षणिक अभ्यासक्रमांसह कलात्मक क्षेत्रातही अनुभूती स्कूल अधोरेखित करण्यासारखे यश प्राप्त करीत असते. यात स्कूलमधील शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांसह विद्यार्थी व पालकांचे विशेष कौतूक आहे.

अनुभूती स्कूलने वेगळेपण अधोरेखित केले -अशोक जैन,

अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.

‘शिक्षण हा सभ्यतेचा एक आविष्कार आहे’ असे मानणारे श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांच्या विचारांवर आधारित, शैक्षणिक मूल्यांसह सामाजिक संवेदना जपणाऱ्या अनुभूती स्कूलने भारतातील शाळा क्रमवारीत ‘एज्यूकेशन वर्ल्डस इंडिया स्कूल अवॉर्डस’ ने वेगळेपण अधोरेखित केले आहे. अनुभूती स्कूलमधील शिक्षक-शिक्षकतेतर सहकाऱ्यांसह पालक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतूक वाटते.

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like